प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
मंचर दि १० ऑक्टोबर
मंचर येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज गल्लीतील श्री भैरवनाथ जोगेश्वरी नवरात्रोत्सव मंडळाच्या महाआरतीस ऊपस्थित राहुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका संघटिका प्रा सुरेखाताई अनिल निघोट, भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्रा अनिल नारायणशेठ निघोट, शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे, महिला आघाडी शहर समन्वयक शितलताई बागल, कल्पनाताई बाणखेले, पंडित ताशेरे, संजय काळे, निलेश मोढवे,, अध्यक्ष वंदना मोढवे, उपाध्यक्ष भाग्यश्री लोखंडे, सचिव राधिका काळे, कार्याध्यक्ष मोहीनी माशेरे, शकुंतला थोरात,सोनल महाजन,शिल्पा गांजाळे,ऊज्वला सावंत,किर्ती डावखरेयांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडी नवरात्रोत्सव करंडक प्रदान केला.
यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी ब्युटीशियन शिल्पा बनबेरु यांच्या मार्गदर्शनाखाली नवदुर्गा सादर केल्या ज्यात धुमादेवी,मांढर ची काळुबाई,ब्रह्मचारीणी, वैभव लक्ष्मी,धनलक्ष्मी,अर्धनारी, वैष्णोदेवी ,जगदंबा, अंबाबाई, दुर्गामाता,एक अशी विविध रुपे व अभिनयातुन त्या देवींचं महत्त्व सांगितले. यावेळी परीक्षक म्हणून ब्युटीशियन शिल्पा बनबेरु, स्मिता कामठे, शितल शिंदे आणि नुतन कानसकर यांनी काम पाहिले. प्रथम क्रमांक सोनल महाजन अर्धनारी नटेश्वर, द्वितीय क्रमांक ब्रह्मचारिणी राधिका काळे,त्रुतिय क्रमांक वंदना मोढवे दुर्गमाता तर चतुर्थ क्रमांक रेणुका मैड वैष्णव देवी यांचा आला, परीक्षक व प्रा.सुरेखाताई निरोप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी महिला भगिनींनी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment
0 Comments