प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
पारगाव दि११ ऑक्टोबर
पारगाव चे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सन २०१९-२०,२०-२१,व २०२१-२२ या कालावधीचे मानधन रक्कम रुपये ५५५५/- रूपये अवसरी बु"विद्या विकास मंदिर येथील कु.सार्थक रामदास कोहिनकर इयत्ता ७ वी शिक्षण घेत असून घरची परिस्थिती अत्यंत गरीबी ची असून तसेच सार्थक शाळेत होतकरू आणि हुशार मुलगा आहे.विठ्ठल ढोबळे यांना सामाजिक क्षेत्रात आवड असल्याने गेली अनेक वर्षांपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वतःहा चा वाढदिवस नेहमी ते अनाथ, निराधार, निराश्रित बालकाश्रम,बालगृह पुलवामा हल्लात शहिद जवानांच्या वारसांना आर्थिक मदत, ऊस तोड कामगारांच्या मुलांला शैक्षणिक शालेय साहित्य मदत,कोव्हिड काळात श्री क्षेत्र आळंदी देवाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी तसेच महागणपती रांजणगाव या ठिकाणी सॅनिटेशन मॉस्क, रक्षाबंधन निमित्त अंगणवाडी सेविकांना साडी वाटप जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगांना मोफत स्वटेर,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जिल्हा परिषद साखर शाळा या ठिकाणी बाल आनंद मेळावा तसेच मिठाई खाऊचे वाटप,पहाडदरा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त गणवेश वाटप,वढू तुळापूर येथील माहेर संस्थेच्या विद्यार्थीना मदत अशा अनेक ठिकाणी मदत नेहमी करत राहणार असल्याचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सांगितले.ते सन २०१३ ते आजतागायत ग्रामपंचायत पारगाव या ठिकाणी सदस्य म्हणून आहेत.
यावेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र गावडे तसेच माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या हस्ते धनादेश ५५५५ रुपये देण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका माधुरी खानदेशी,अंकुश टाव्हरे,प्रविण हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments