चारोळ्या
जगायचं आहे तर -
माणूस म्हणून जगा
बघायचं आहे तर -
माणूस म्हणून बघा
शंभर वर्षे जगून-
करायचं तरी काय ?
थोडंसं जगून पण -
अर्पिता येतो हृदय
आयुष्य जगण्यासाठी
जगूनच दाखवावे
जगताना जगालाही
आपले करू पहावे
खाण्यापिण्याशि़वाय -
माणूस जगू शकतो
परंतू प्रेमाशिवाय -
माणूस जगू शकतो ?
आपणच खूप मोठे
नका कधीच समजू
कधी कधी आपलीही
लंगडी पडते बाजू
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments