ठाणे:- दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्ल्ड व्हिजन मुंबई संस्थेचे संस्थापक आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे संपादक नागेश हुलवळे आणि सह संपादिका सौ नीलम शेलटे यांनी मराठी राजभाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून साहित्य दैनिकाच्या निर्मिती सोबत या वर्षी "पसायदान" या नावाचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई तर्फे आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स हे साहित्य दैनिक . कवी, लेखक साहित्यिक यांच्या लेखणीला चालना देण्यासाठी प्रकाशित करण्यात येते . अभिजात राजभाषा मराठी रसिक वाचकांसाठी या "पसायदान" दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्यिक मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
सदर दिवाळी अकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर, ज्येष्ठ साहित्यिका लीला गाजरे, ठाणे भुषण डॉ. स्व नारायण तांबे स्तंभ लेखिका पुरस्कर प्राप्त सौ. सावित्री ताई झांबरे यांच्या शुभ हस्ते ठाणे येथे साध्या पद्धतीने करण्यात आले.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. त्यांनतर नंतर कवयित्री सौ. शशिकला कुंभार यांनी सुंदर आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे,ओतूरकर तर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिका मा. श्रीम. लीलाताई गाजरे, सुप्रसिद्ध स्तंभ लेखिका सौ. सावित्री ताई झांबरे, कवयित्री सौ. शशिकला ताई कुंभार, संपादक प्रा. नागेश हुलवळे, श्री. दिगंबर गिरणारकर, तानाजीराव झांबरे सर, सौ. उषा हुलवळे, सई हुलवळे, मयुरेश शेलटे आणि सह संपादिका सौ नीलम शेलटे हे मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेश साबळे, ओतूरकर म्हणाले. 'दिवाळीच्या दिवसात ही सुंदर साहित्य मेजवानी रसिका वाचकांच्या भेटीस येत आहे.
ज्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला पसायदान मागितले, आणि प्रेम आणि जिव्हाळ्याचा संदेश पसायदानाच्यात रूपाने सर्व जनमानसात जगभर पोचविला. तेच '' पसायदान " हे नाव दिवाळी अंकाला दिले त्याबद्दल संपादक प्रा नागेश हुलवळे आणि सह संपादिका सौ.नीलम शेलटे यांचे मनापासून अभिनंदन करुन, सर्वांनी आपली मराठी मायबोली घरा घरातून बोलावी. तरच आपल्या मराठी भाषेला चांगले दिवस येतील. त्यासाठी हा साहित्यिक लेखन प्रपंच.. त्यातूनच साहित्यिकांच्या कवी, लेखक आणि साहित्यिक मंडळींच्या लेखणीला चालना देण्याचे काम होणार आहे... मराठी मायबोली अभिजात झाली. याचे औचित्य साधून पसायदान दिवाळी अंकाची निर्मिती झाली. हे जरी खरे असले तरी तिचे संवर्धन आणि तीला समृध्द करण्याची जबाबदारी आपली आहे. हे विसरून कसे चालेल.. त्यासाठी सर्वांनीच ती घरा घरात, बाजारात, ऑफिस, कार्यालयात, शाळेतील सभा संमेलनातून एकमुखाने आपण बोलली पाहिजे.
नुसता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून ती समृध्द होणार नाही..
दिवाळी अंकाला " पसायदान" हे नाव देण्याची कल्पनाच मुळात प्रेरणादायी आहे. त्यासाठी संपादकाचे विशेष आभार..
या दिवाळी अंकात अनेक नामांकित कवी, लेखक आणि साहित्यिक मंडळींचे साहित्य असून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविताही त्यात आहेत. शालेय जीवनात मुलांना सुचलेल्या कविता किती दर्जेदार आहेत हे सदर दिवाळी अंक वाचल्या शिवाय कसे कळणार.. सदर दिवाळी अंक राजसा प्रकाशन उल्हासनगर ठाणे यांनी प्रकाशित केला आहे .या अंकाचे सुंदर असे मुखपृष्ठ कु. मानसी संदीप साळवी या विद्यार्थ्यांनीने तयार केले आहे. तिचेही मनापासून अभिनंदन !! सदर प्रसंगी वर्ल्ड व्हिजन मुंबईच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्या बरोबर नीलपुष्प साहित्य मंडळाच्या सदस्या आणि ज्येष्ठ कवयित्री सौ. शशिकला ताई कुंभार यांनी दिवाळी निमित्ताने भेट वस्तू देवून सर्वांचा यथोचित सन्मान केला. त्याबद्दल सौ. शशिकला ताई कुंभार यांचे मनापासून आभार !! तसेच सर्व कवी, लेखक, साहित्यिक मंडळींनी वेळेवर लेखन साहित्य पाठवून सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांना मनापासून धन्यवाद!! सदर अंक ऑनलाईन, व्हॉट्स ॲप ग्रुपवर फेस बुक उपलब्ध होणार आहे. रसिका वाचक मंडळींनी आपणास सदर पसायदान हा दिवाळी अंक कसा वाटला त्यासाठी आपले अभिप्राय नक्की पाठवावेत म्हणजे पुढील वर्षी सदर दिवाळी अंक प्रकाशित करतांना आपल्या सूचना विचारात घेवून सदर अंकाची निर्मिती करता येईल. कार्यक्रमांचे खुप छान असे सूत्र संचालन सौ. नीलम शेलटे यांनी केले आणि सर्वांनी पसायदान म्हणून झाल्यावर प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.
राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर ठाणे
मो. ९००४६८४२६३


Post a Comment
0 Comments