चारोळ्या
अति घाईपण नको
अति संथपण नको
काम करताना मात्र -
हलगर्जीपण नको
उशीर झाला म्हणून -
कशाला बसावे गप्प ?
कधी कधी उशीरही -
फायद्याचे वाटे खूप
स्वतः मी दुःखी असता -
दुःखा कां मी दुखवावे ?
उलट सणासुदीला -
गोडधोड जेवू द्यावे
आजवर जीवनात -
जवळ कुणी ना आले
आज भोवताली माझ्या -
बागच फुलून आले
जग पाहिलोच आहे
माणसेपण पाहिली
जगी वावरावे कसे -
हेच कां कळेना झाली ?
राब राबले तरीही -
राबणे संपेना झाली
सीधंसाधं जगूनही -
कष्टाचं कां जीणं आलं ?
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments