Type Here to Get Search Results !

पुणे येथे २७ ऑक्टोबर रोजी रंगणार भिडेवाडा पुणे शहर काव्य संमेलन.



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )

भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पुणे येथील गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्री बाई फुले सभागृहात २७ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित केले आहे. पुढील पिढीसाठी भिडे वाड्याचा इतिहास जतन करून ठेवण्याचे मोठे काम या काव्य महोत्सवातून होईल. पुण्याच्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक विजय वडवेराव यांनी भिडेवाड्यासारख्या देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान असलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक वास्तुबद्दल महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख, वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव उद्देशाने मार्च २०२४ मध्ये भिडेवाडा बोलला या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजनदेखील केले होते. त्याच आधारावर पुणे येथे २७ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. यात जास्तीत जास्त संख्येने कविसंमेलनात सहभाग नोंदवावा, असे विजय वडवेराव आणि पुणे शहर कमिटी यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments