Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

देवा , तुझ्या दरबारी

लाखों येती दीन भक्त

तू मात्र दर्शन देतो?‘:

श्रीमंतांनाच कां फक्त ?


देवाला विचारा ,देवा -

तुला कां हवेत पैसे ?

तू रे इतका श्रीमंत

पुन्हा कां मागतो पैसे ?


देवा , भक्त हे उपाशी

तू मात्र रोज तुपाशी 

असा कसा रे देवा तू -

भेद तुझ्यात कां अशी ?


देवा , तू आम्हां सर्वस्व

सगळं काही दिलास 

पण माणूस कळाया -

मन कां न तू दिलास ?


देवाला सगळं ठाव

जगी कोण कसा आहे

वेळ येईतो थांबतो

वेळेआधी नेतो आहे

@ सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो.नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments