Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

प्रत्येक दिवशी तशी

प्रत्येक गोष्ट वेगळी

आजचे वाईटसुध्दा -

उद्या वाटेल चांगली


जगी आज प्रत्येकांत -

भीती आणि भय आहे

खोटे बोलतात त्यांचा -

सर्वत्रच जय आहे


आज सगळे आपले

उद्याला होती दूरचे

आपण मात्र सदैव -

म्हणू पाहतो आमचे


आपली तहानभूक

आपल्यालाच कळतं

कुणी ढेकर दिल्यानं -

आपलं पोट भरतं ?


प्रत्येक प्रश्नाला तसं -

उत्तरपण असतं

माझं प्रश्न सोपं पण -

उत्तर कां न मिळतं ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो . नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments