Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत.... वाचा



चारोळ्या


उद्याचा नको विचार 

उद्याचे उद्याचे बघू

आझ जगावेत कसे -

हेच आजच्याला बघू


आपल्या मर्जीनुसार

साऱ्यांना तसे जगू द्या

 स्वातंत्र्य म्हणजे काय

हेही साऱ्यांना कळू द्या


वाचावेत असे काही

वेचावेत असे काही

पेरावत असे काही

उगवावे असे तसे काही


जे काही आपले आहे

आपलेच राहणार

जे काही सर्वांचे आहे

सर्वांचे ते राहणार


जगी स्वतःचा विचार

प्रत्येकजण करतो

इतरांच्या बाबतीत

कुणी लक्ष कां न देतो ?

कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments