बुधवार दिनांक ९ आक्टोबर २०२४ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंच जुन्नर विभाग शहर प्रमुख कवी यशवंत घोडे सर यांनी जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून बुधवारी जुन्नर टपाल कार्यालयात जाऊन कोरोना काळातही निस्वार्थी पणे राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी म्हणून काम करताना कचराई केली नाही.
लॉकडाऊनच्या काळात डाक
कर्मचारी मदतीला धावले
पीपीई किट घालून आजारी वृद्ध
व्यक्तींना औषधोपचार पुरवले..
भारतीय टपाल तिकीट आहे
मौल्यवान इतिहासाचा ठेवा
इंटरनेटच्या जाळ्यात अजूनही
सक्रीय आहे टपाल सेवा..
स्पर्धेच्या आधुनिक युगात सोशल
मीडियामुळे पत्राचा विसर पडला
भूतकाळात पत्र ऐतिहासिक
सुख दुःखाचा साक्षीदार घडला..
टपालाने आपल्या माणसांपर्यंत
तत्पर पोहोचवल्या भावना,इच्छा
टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना
वर्षभरात केलेले सहकार्य बद्दल आभार मानले जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा गुलाब पुष्प देऊन व मनातील पाऊस काव्यसंग्रह भेट देऊन सन्मान केला.
जुन्नर पोस्टमास्तर वैभव तिखे
पोस्टमन हरिभाऊ साबळे, पोस्ट मन संजय शिराळशेठ, पोस्टमन अनिरुद्ध कामटकर,पोस्टमन किरण सोनवणे,व इतर स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.
टपाल कर्मचाऱ्यांचे ॠण व्यक्त करण्यासाठी गेली पंचवीस वर्षे नक्षत्रांचे देणे काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक कवी वादळकार प्रा राजेंद्र सोनवणे सर हा आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्रभर काव्यमंचच्या सभासदां तर्फे जवळपासच्या कार्यालयात राबवत आहेत.
उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
Post a Comment
0 Comments