Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 

प्रत्येक माणूस आज -

सुखाचाच शोध घेतो

दुःख येते म्हणताच-

पळ  कां काढू पाहतो ?


असे कितीदा मरता - ?

आत्ता तरी जागे व्हावे

जगायचेच असेल -

तर पेटून उठावे


जे काही होत असते

ते कुणा दिसत नाही

जे कधी घडत नाही

तिथेच कां लक्ष जाई ?


नका देऊ दोष कुणा -

नका कुणालाही शिक्षा

जो तो भोगतोच आहे

आपल्या कर्माची शिक्षा


चांगला माणूस होणे

माणूसच विसरला

नको त्या संगती जात -

स्वतःलाही विसरला

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून ) 

मो .नं .0 7620540722

Post a Comment

0 Comments