Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 " चारोळ्या "

दिवाळी आली म्हणून -

ज्योत - दिवा पेटविली

अंतरात्मी दिवा मग -

कुणी पेटवेना झाली ?


किती पेटवावी दिवे

किती जुळवावी मनें

अंधार जाता जाईना 

अंधुक बरीच गावे


घराघरात दिवाळी 

मनामनात अंधार

दिवा पेटवूनपण -

कां नाही प्रकाशपूर ?


जगी सर्वत्र दिवाळी

जगी अंधारच कशी ?

श्रीमंत खातो तुपाशी

गरीब मात्र उपाशी


फाटका माझा संसार

फाटकीच माझी झोळी

किती पेटवावी दिवे -?

तरी काळीच सावली 

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments