Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या

 


चारोळ्या 

माणूस कुठे म्हणून -

देव माणसा शोधतो

देव भेटावा म्हणून -

माणूस देव शोधतो


पैशाची गोष्ट कळते

प्रेमाची गोष्ट कळेना

आज प्रेमापेक्षा पैसा-

अधिकच श्रेष्ठ म्हणा


उच्च-  नीच कोण इथे ?

सगळे एकसमान

माणूस म्हणून तर -

सा-यांत एकच गुण



वाटेत जीवनाच्या रे -

काटेच काटे चौफेर

तरी चालतोच आहे

गाठाया ध्येयमंदिर


जीवन सुंदर आहे

आधी जगायला शिका

जगायचे खूप बाकी -

आशावाद सोडू नका

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो . नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments