@ चारोळ्या @
कालपरवापर्यंत -
सारं काही ठीक होतं !
आज मात्र अचानक -
व्हायचं कां नाही होतं ?
तोंडावर बोलणारे -
खरे बोलून जातात !
लाडीगोडी बोलणारे
कधीही दगा देतात !
लोक काहीही म्हणोत -
लोकांचं ते काम आहे !
आपण काय करावं -
आपलं ते काम आहे !
लोकांची तोंडं आपण -
बंद कसं करायचं ?
याला एकच उपाय -
आपण गप्प राह्यचं !
माणसाला माणसाची -
कुठे राहिली गरज ?
आज ना माणूस नाही -
ना माणसांचा समाज !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं . 07620540722

Post a Comment
0 Comments