@ चारोळ्या @
चांगलं घडू पहाया -
शिलकीत आहे काय ?
जे काही घडते आहे -
ते योग्य म्हणावे काय ?
सुखाची गोष्ट अशी की -
अजूनही वेळ आहे!
दुःखाची बाब अशी की -
वेळ खूप कमी आहे !
कुणासाठी जगायचं
कुणासाठी मरायचं !
आपलं कोण म्हणून -
राब राब राबायचं ?
एखाद्या खेळगीगत -
जगी मी खेळणी झालो !
कुणी कसं खेळवावं -
तसं खेळत राहिलो !
किती अंत पाहणार -
सांग देवा आत्तातरी ?
अंत दारी येऊनही -
कां येईना माझ्या घरी ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments