@ चारोळ्या @
जगाने जगाचा कसा -
उघडा बाजार केला
म्हणून माणूसपण-
उघडा नागडा झाला
जगात शाश्वत असं -
कुठं काहीच नसतं
आज असेल सजीव
उद्याला नश्वर होतं
माझा मीच जगलेला
माझा मी आज मेलेला
म्हणून माझ्या शवाला -
माझा मीच खांदा दिला
ना ओळख ना पाळख
तरी सारखी सोबत
परकं असूनपण -
आलो ओळख सांगत
जगाला मंदिराचंच-
आज कळस दिसतं
तिच्या पायी रुतलेलं -
दगड नाही दिसत
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments