@ चारोळ्या @
गरीब सांगत नाही
करुनच दाखवतो
श्रीमंत फक्त सांगतो
करत काही नसतो
इतके कसे श्रीमंत-
पैशामागे धावतात ?
श्वास घेणं पण त्यांना -
कां मिळेना फुरसत ?
गरीब अति गरीब
श्रीमंत अति श्रीमंत
तरी मृत्यूला करतो -
गरीब अति श्रीमंत
श्रीमंत जगतो पण -
मरायला जास्त भितो
गरीब जगतो पण -
जगायला जास्त भितो
वाद कुठे होत नाही
वाद प्रत्येकांत होतो
गरिबांत होतो तसं -
श्रीमंतांत पण होतो
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments