प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारासाठी शिक्षिका ,कवयित्री लेखिका सरिता म्हेत्रे कलढोणे यांची निवड करण्यात आली आहे.
कवी विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानात तसेच क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले आणि माय सावित्री यांच्या विचारांचा वसा घेऊन या चळवळीत कार्य करणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी, कार्याला गती व प्रोत्साहन मिळावे म्हणून आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात सरिता म्हेत्रे कलढोणे यांची निवड करण्यात आलीआहे.
२ ते ५ जानेवारी दरम्यान देशात पहिल्यांदाच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये एस. एम. जोशी सभागृह पुणे येथे सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सरिता म्हेत्रे कलढोणे ह्या जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांच्या शब्दांच्या गाभाऱ्यात या कवितासंग्रहाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments