Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @


जगायचं आहे तर -

मोकळेपणानं जगा !

आपणां कसं वाटतं -

तसंच जगणं जगा !


आपल्याकडे जे आहे -

ते खुल्यादिलाने देऊ !

भेदाभेद न ठेवता -

एकमेका देऊ- खाऊ !


जगणे अजून बाकी 

मरायची कां रे चिंता ?

काही देणे- घेणे आहे

अजुनी आपुल्या हाता !


नाक बंद , तोंड बंद

चालणं - फिरणं बंद !

मग जगायचं कसं -

तेही कां करावं बंद ?


जगणं राहून गेलं -

असं कधी नका म्हणू !

जगणं अजून बाकी -

असंच आपण म्हणू !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments