@ चारोळ्या @
देवा, देव नाहीस तू -
देवा, दगडच तू !
इतकं सारं होताना -
बघत कां बसला तू ?
प्रसिध्दीसाठी माणूस -
काहींही करू शकतो !
नागडं ' हो ' म्हंटलं की -
नागडंपण तो होतो !
लोक सांगतात एक
आणि करतात एक !
विश्वास ठेवावा असा -
कुणी एक ना लायक ?
कुणाशी बोलणे नको
कुणाला सांगणे नको !
आपले आपण जगू -
कुणाशी वादही नको !
राजा असो किंवा रंक
सर्वांना एकच न्याय !
मग आपल्या राजाला -
वेगळाच कसा न्याय ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments