Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 @ चारोळ्या @


कुठल्या हेतूसाठी मी -

जगलो कधीच नाही !

वाटेत असंख्य कांटे -

तरी थांबलोच नाही !


आपण चालतो तसं -

इतरांनाही चालू द्या !

इतरांच्या कामातही -

आपले योगदान द्या !


दुःख इतरांचे असो -

आपले घ्या समजून !

उद्याचे दुःख आपले -

घेतील ते उमजून !


आले किती, गेले किती -

कधी नाही मी मोजली !

उन्हात उभे राहून -

सावलीही ना धरली !


आयुष्याच्या प्रवासात -

कमावलो काही नाही !

माझ्या स्वार्थासाठी पण -

कुणा फसवलो नाही !

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments