Type Here to Get Search Results !

लेख : दादासाहेब फाळके: एक शोकांतिका

 


सुमारे २० वर्षांपूर्वी भारत सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला व काही अशी फाळके यांनी चित्रपटसृष्टीवर कलेच्या मूलभूत कार्याचे अक्षरशः सोनेच केले. त्यांनी केलेल्या कार्याचा चौफेर वाढला. आज सव्वा कोटी सिनेप्रेक्षक असून सुमारे सातशे नियतकालिके या सिनेमा सृष्टीवर आपला धंदा करतात. सिनेमाकारांच्या रूपाने करोडो रुपये दरवर्षी मिळवणारे सरकार व हजारो लोक या सिनेमा व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवितात नाव पैसा कमविताता. त्या व्यावसायिकांनी तरी दादासाहेब फाळके यांच्याविषयी विचार करायला हवा होता. खरे तर भारतीय चित्रपटसृष्टीची कहानी यांच्यापासूनच सुरू झाली. पण दादासाहेब दुर्मिळ चित्र आणि चरित्र बऱ्याच जणांना अजून अज्ञातच आहे. त्यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्यावहिल्या मुकपटाने १९१३ साली भारतामध्ये चित्रपटयुगाचा प्रारंभ झाला. आज या चित्रपटयुगाने वृद्धांपासून लहान बालकांपर्यंतचे सर्वांचे त्या त्या दृष्टीने मनोरंजन केले. सिनेमा हे आजचे लोकप्रियतेचे प्रभावी माध्यम बनले आहे. एखादा नवीन नवीन सिनेमा लागला की सदर थिएटरवर सकाळीच भली मोठी रांग लावून असतात. पण या वेड्या भारतीय सिनेमाकर्त्यांना साधीसुधी आठवण का येत नाही. याचे राहून राहून आश्चर्यच वाटते. भारतीय सिनेमाकर्त्यांचे या चित्रपट निर्मिती काळात काय जीवघेणे हाल झाले काय वनवास झाला ? ते सुखाने कधी एक घास जेवले का ? किंवा क्षणभर तरी सुखाने झोपी गेले का ? याचा आजतागायत कुणीच विचार केला नाही. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींनीही वरदहस्त लाभलेल्या अनेक व्यक्ती फाळके पुरस्कारांनी गौरविल्या गेल्या होत्या आहेत. त्यांनी तरी योग्य विचार करून त्यांच एखाद स्मारक उभ केलं काय ?

खर तर दादासाहेब फाळकेंना राजा हरिश्चंद्र , सत्यवान सावित्री , भस्मासुर मोहिनी , सेतुवधन आदी चित्रपट निर्माण करताना प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज द्यावी लागली. हे सिनेतंत्र आत्मसात करण्यासाठी त्यांनी लंडनची वारीदेखील केली. त्यांची जिद्द व बुद्धिमत्ता पाहून तेथील तेथील चित्रपट निर्मात्यांनी त्यांना तेथेच राहण्याबद्दल मोठी रक्कम , भरपूर पगाराचे आमिष दाखवले पण दादासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. 


दादासाहेबांनी सिनेसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. अशा धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झाला. मुंबई व बडोदा येथील कलाकेंद्रात त्यांचे शिक्षण झाले. फोटो - लिथो - ग्राफी इंग्रेविंग व त्रायक्रोमटिक प्रोसेसच्या अभ्यासासाठी ते जर्मनीला गेले नंतर भारतात आल्यावर त्यांनी फाळके आर्ट प्रिंटिंग वर्क्सची स्थापना केली. व राजा हरिश्चंद्र हा चित्रपट १९१३ साली तयार केला. मोहिनी भस्मासुर व सावित्री या चित्रपटांमुळे त्यांना बरीच कीर्ती लाभली. नंतर ही हिंदुस्तान फिल्म कंपनी त्यांनी काढली. व लंकादन , कालिया मर्दन , श्रीकृष्ण जन्म हे पौराणिक चित्रपट काढले व ते चांगलेच गाजले. त्यांनी भारतीय संस्कृतीचे चित्रपटाद्वारे जगाला दर्शन घडून दिले. आज या सिनेसृष्टीत त्यांची जगाला ओळख झाली. पण या सिनेसृष्टीत वावरणाऱ्यांना अजूनही त्यांची खरी ओळख झाली नाही असेच म्हणावे लागेल.


आज या देशात सिनेमा माध्यम व्यवसाय त्याचा इतिहास यांचा पूर्ण अभ्यासपूर्ण व प्रभावी दर्शन करून देणारे त्याला सर्वस्वी वाहून देणारे एक स्वतंत्र वस्तुसंग्रहालय नसावे. त्यांच्या नावाचे फिल्म इन्स्टिट्यूट नसावे. त्यांच्या नावाचे स्मारक नसावे. व अद्ययावत सुसज्ञ भव्य दिव्य थिएटर नसावे याचा खेद वाटतो.

सूर्यकांत ना. कामून ( सोलापूर )

Post a Comment

0 Comments