Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



@ चारोळ्या @

आईविना बाप नाही

बापाविना आई नाही

आई आणि बापाविना

हा जन्म , हे जग नाही


जगी कारणांशिवाय

काहीच घडत नाही

आणि कारणांशिवाय 

कुणी बोलतही नाही


आपली चूक आपण

कधी ना मान्य करतो

इतरांची चूक मात्र -

नजरेत कां आणतो ?


काल भूतकाळ होता

आज वर्तमान आहे

भविष्याचा वेध घेत -

आपणां जगणे आहे


बुडाखाली आग तरी -

आग झेलावी लागते

पायी जरी लाख कांटे -

वाट चालावी लागते

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . ०७६२०५४०७२२


Post a Comment

0 Comments