Type Here to Get Search Results !

डिसेंट फाउंडेशन ने केली अतिदुर्गम भागातील "ती"ची दिवाळी गोड.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )

डिसेंट फौंडेशन ही एक सामाजिक संस्था मागील आठ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि आरोग्यविषयक क्षेत्रात काम करत असून संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात .त्यातलाच एक साडी तीच्यासाठी हा एक उपक्रम 

“ती” म्हणजे मांगल्य 

“ती” म्हणजे मातृत्व 

“ती” म्हणजे कर्तुत्व 

आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी राबणारी ती ऊस तोडणी कामगार ,वीटभट्टी कामगार ,आदिवासी दुर्गम भागातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबासमवेत डिसेंट फाउंडेशन दरवर्षी दिवाळी साजरी करत आहे .दरवर्षी जवळपास पाच हजार कुटुंबात डिसेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून एक साडी आणि दिवाळीचा फराळ वाटप केले जाते .यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक व वस्तू स्वरूपात संस्थेला मदत करतात .



यावर्षी ऊस तोडणी कामगार महिला ,वीटभट्टी कामगार महिला ,प्लास्टिक जमा करणाऱ्या महिला त्याचबरोबर खेतेपठार या आदिवासी व अतिशय दुर्गम भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत डिसेंट फाउंडेशनने दिवाळी साजरी केली. खेतेपठार भागातील साबळे वस्ती, करवंदे वस्ती, तांबटमाळ व घनकोटवाडी या वस्त्यांवर जाऊन त्या लोकांशी संपर्क साधला. जिथे जाण्या - येण्यासाठी नीट रस्ता नाही. एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर तिला झोळीत घालून पठारावरून खाली आणावे लागते. जिथे कोणत्याही प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी एक तास पायपीट करून मोलमजुरीला जावे लागते. जिथे पाण्याचे देखील खूप मोठे दुर्भिक्ष आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत लोक आपले जीवन जगत आहेत. अशा लोकांमध्ये जाऊन डिसेंट फाऊंडेशनने दिवाळी साजरी केल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव एफ.बी.आतार ,संचालक आदिनाथ चव्हाण.

Post a Comment

0 Comments