Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 @ चारोळया @

कशात नसूनही मी -

असल्याची कां भावना ?

असून मी सर्वांठायी -

नसल्याची कां वेदना ?


दुख विसरण्यासाठी -

स्वतः हसायला शिका !

इतरांना पुढे जाण्या -

स्वतःहून द्यावा मौका !


तुम्ही कितीपण शिका  

कितीही मिळवी डिग्री !

नसेल संयम-रीत 

कसल्या कामाची डिग्री ?


कधी कुणा भावपण -

अति जास्त देऊ नये !

आपल्याशिवाय जग -

नाही असे वाटू नये !


देता आलं तर द्यावं

आपलं थोडंसं सुख !

देव करेल आपलं -

जीणं जगण्यालायक !

@कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून ) 

मो .नं . 0762054072

Post a Comment

0 Comments