Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या

 


@ चारोळ्या @


श्रीमंती काय कामाची ?

भिंतीवरचा तो चुना !

आज दिसेल तो लख्ख -

उद्याला तो कुठे कुणा !


पैशापुढे नाचतात 

सगळे सोडून लाज !

मानपान सब झूठ

पैसा फक्त श्रेष्ठ आज !


नाही कुठे आस्था आज -

नाही कुठलेच  नातं !

पैसा असेतोवरच -

जुळवू पाहती नातं !


आशा आणि विश्वासाचं -

घट्ट विणूयात नातं

सुख असो किंवा दुःख 

राहू आपण सोबत !


स्वच्छतेच्या ठिकाणीच -

कां होतसे झाडलोट ?

जिथे घाणीचे साम्राज्य -

तिथे कां पोचेना हात ?

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments