@ चारोळ्या @
आपल्याच हाती आहे -
मत कुणाला द्यायचे !
मत देताना आपण
नको विकले जायचे !
योग्य व्यक्तीला देऊन -
मताचे पावित्र्य राखा !
चोर, लुच्चा, पाखंडींना
द्या जबरदस्त धक्का !
उमेदवार राज्याचे -
हित पाहणारा हवा !
आपल्या मताची बूज -
राखणारा नेता हवा !
लोकशाही वाचवणं
सर्वस्वी आपल्या हाती !
आपले मत म्हणजे -
नव्हे कधी धुळमाती !
मताचे मोल ओळखा
आणि मतदान करा !
आपल्या मतावरच -
राज्याचा स्वच्छ चेहरा !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .07620540722
Post a Comment
0 Comments