Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा खं. र. माळवे यांची वर्षाखेर निरोप रचना



 वर्षाखेर निरोप


जन्माला आले 

किती वर्ष लोटली 

मित्रासवे मिसळले 

हिच ती गती वाढली ||

असे तसे भेटले 

जीवन घडविले 

कोणी हे मढविले 

सुखदुःखात वाढले ||

याच या सावलीत 

निखा-यात वाचले 

कधी एकांतात 

भूमातेने सावरले ||

अथांग विचारांनी 

या मैफलीत राहोनी 

संसार व्यापानी 

आनंदमय जाहले ||

वर्ष ही लोटतील

आहे जगी उरतील 

सकर्माने घडतील 

दसदिशा झळकतील ||

वर्ष येतील जातील 

आहे बदल घडतील 

माणूस माणसातील 

युगानुयुगे राहतील ||

हा निरोप वर्षांचा 

आधी समजविण्याचा 

जीवंतपणी साचा 

समृद्ध भाषकांचा ||

मराठी भाषा तेवढी 

वाढवा मांदियाळी 

महाराष्ट्रा एवढी

जगी गाजवा परमळी ||

नमस्कार सर्वांना 

कृपावंत दयावंत 

मेहरबान सदना 

आशिर्वाद बुद्धीमंत ||


मो 9967394281

डॉ खं र माळवे-खरमा

Post a Comment

0 Comments