प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी जुन्नर येथिल गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यावेळी १०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.
रुग्णांना तपासणी,मोतिबिंदू शस्त्रक्रिया,प्रवास,निवास,जेवण ,चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षभरात डिसेंट फाउंडेशन,पुणे , शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून तीन हजार पाचशे पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशन ने केला असून, त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहेत. तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यवा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले .
यावेळी तेजस शिंदे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी दिली .
याप्रसंगी सचिव डॉ.एफ.बी.आतार , डॉ.वर्गीस , शंकरा आय हॉस्पिटल चे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम , प्रा.एकनाथ डोंगरे,तेजस शिंदे,किसन मेहेर,हभप मुरकुटे महाराज,हभप पोपट महाराज खंडागळे, गणेश मेहेर योगेश वाघचौरे,अभिजित सुरगुडे,आदी मान्यवर व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments