मुंबई:- १ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई मुलुंड येथे झालेल्या जुन्नर - आंबेगाव तालुका मुलुंड रहिवासी विकास मंच मुंबई यांनी आयोजित केलेल्या २५ व्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात जुन्नर तालुक्यातील ओतूर गाबचे सुपुत्र आणि नीलपुष्प साहित्य मंडळ, संत गाडगे महाराज विचार मंच ओतूर महाराष्ट्र राज्य, श्रावणधारा काव्य समिती ओतूर तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच (रजि.) महाराष्ट्र राज्य कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतूरकर यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक मा. द. शं. काकडे, जागतिक कीर्तीचे चित्रकार आणि जुन्नर - आंबेगाव तालुका मुंबई रहिवासी मुंबई संघाचे सचिव आणि कवी मा. सुरेश डुंबरे कार्याध्यक्ष मा. विष्णूपंत कोरडे, अध्यक्ष मा. सुधाकर भालेराव, शिवनेर भूषण, प्रसिध्द स्तंभ लेखिक मा. संजय नलावडे, संस्थेचे खजिनदार मा. शांताराम भालेराव, सदस्य मा. मारुती शिंगोटे, साहित्यिक मा.रमेश हांडे आणि अनेक सन्माननीय पाहूणे मंडळींच्या उपस्थित सन्मान सोहळा संपन्न झाला.
राजेश साबळे, ओतूरकर यांनी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात ३८ वर्षे सेवा झाली असून सद्या त्यांच्या सेवानिवृत्ती काळात राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना अनेक वेळा सन्मानीत करण्यात आले आहे. आजतागायत त्यांची कथा व कवितांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित असून आगामी काळात प्रश्नचिन्ह? अस्तित्व ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आणि सद्या ते चार काव्य साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची कर्मभूमी मुंबई, ठाणे असली तरी जन्मभूमीचा त्यांना खुप अभिमान आहे. त्यांची माझ्या गावचे वैभव ही गाजलेली कविता... युट्यूब, फेसबुक, मुंबई, पुणे आकाशवाणी आणि दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य प्रकाशित होत असते. म्हणून जुन्नर - आंबेगाव तालुका रहिवाशी संघ मुंबई यांनी २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आपल्या भूमिपुत्रांच्या यथोचित सन्मान केला.

Post a Comment
0 Comments