संकलन - डॉ. राजेश्वर हेंद्रे सर
जुन्नर : साप्ताहिक उद्याचा शिलेदार वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन बोतार्डे तालुका जुन्नर, पुणे या ठिकाणी दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार कायदा या संघटनेच्या वतीने डॉ. राजेश्वर हेंद्रे - राष्ट्रीय सल्लागार, मा. सुरेश आप्पा गायकवाड - महाराष्ट्र प्रदेश, सहसंघटक, श्री विलास रोहिले व श्री नागोराव हेंद्रे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ राजेश्वर हेंद्रे यांनी साप्ताहिकाच्या विस्तार आणि प्रसारासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कवी गुरु ठाकूर यांच्या अत्यंत प्रेरणादायी कवितेच्या ओळी सादर केल्या.
||करुनी जाऊ असेही काही दुनियेतून या जातांना||
||गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना||
||स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर होईल कातर कातर||
||नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला देऊ उत्तर आयुष्याला देऊ उत्तर||
||असे जगू या दुनियेमध्ये आव्हानाचे लाऊनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला देऊ उत्तर आयुष्याला देऊ उत्तर||
सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचे बळ घेऊन साप्ताहिक उद्याचा शिलेदार हे साप्ताहिक भरारी मारेल यात शंकाच नाही, असे राजेश्वर हेंद्रे म्हणाले.

Post a Comment
0 Comments