Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आपलं आपल्यावर -

नसते कधी विश्वास !

दुसरे सांगितले की -

ठेवतो आम्ही विश्वास !


प्रेम असेल तरच -

जगण्याला अर्थ आहे !

प्रेमाविना जगातलं -

जगणंच व्यर्थ आहे !


येताना आणत नाही -

जातानाही नेत नाही !

स्वतःसाठी इतरांना - 

सदा मी कां जाळू पाही ?


जीव असेल तरच -

जीवाला जिवंतपणा !

मन असेल तरच -

मनाला मोकळेपणा !


कुणाला म्हणू चांगलं -

कुणाला म्हणू वाईट ?

सगळे एकसारखे -

कुणा म्हणू मी वाईट ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments