चारोळ्या
अंतरंगी आज माझ्या -
नानात-हेचे तरंग !
वादळ घोंगावतोय -
कसा उडवू पतंग ?
आज ना जमले नाही -
उद्याच्याला येऊन जा !
आपली पहिली भेट -
पुन्हा तू जागवून जा !
मी काहीच न बोलता -
तुला कळतंच कसं ?
माझ्या मनातले गुढ -
तू जाणते तरी कसं ?
तू आहेस म्हणूनच -
देवानं मला धाडलं !
आज तूच नाही तर -
जगणं म्हणू कसलं ?
जगी लाखों भेटलेत -
दर्दही माझे जाणले !
तू हाल जाणूनपण -
कधी कां न विचारले ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो . नं . 07620540722

Post a Comment
0 Comments