Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या

 


 चारोळ्या 

पूर्वी जगच आपला -

जग चालवत होता !

आजचं जग आपलं -

पैसा चालवी पुरता !


जगी आज सगळेच -

खोटी नाती जपतात !

आपलेपणाची नाती - 

सांगाल कोण जपत ?


दोघांचे होता भांडण -

आपला होतो माकड !

भांडण मिटेल तेंव्हा -

समजा गोडच गोड !


आज तितकाच राग -

तितकाच पुन्हा त्रास !

कालवर सोसलेलं -

कां आठवते दिवस ?


घाईघाईची जिंदगी -

घाईघाईचं जगणं !

फुरसतीनं जगाया -

वेळ मी आणू कुठून ?

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना . कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments