मुंबई दि.३० - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
बीड मधील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. मस्साजोग मधील सरपंचाची हत्या ही माणुसकीची हत्या झाली आहे असे सांगत रामदास आठवले यांनी या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध केला आहे. आज सकाळी ११ वाजता मस्साजोग या गावी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, रवी जोगदंड, गौतम बचुटे, दिलीप बनसोडे, निलेश ढोबळे,सुरज काळे, प्रशांत हजारे, हरेंद्र तुपारे, दादाराव धेंडे, विनोद शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments