Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


चांगलं वागू पाहता -

जग वाकडं पाहतं !

जग वाकडं असता -

सरळ कां पहावेत ?


चांगल्याला चांगलंच -

आपण म्हणत जाऊ !

वाईटालाही आपण-

चांगलं म्हणत जाऊ !


दिसायला तसं जग -

वरून छान दिसतं !

डोकावून पाहिलं की -

कसंसं वाटू लागतं !


बोलण्याआधी आपण -

जगाचंपण ऐकावं !

जग काय म्हणतेय -

तेपण थोडं ऐकावं !


आजचे लोक पैशात-

खूप खूप बोलतात !

प्रेमाच्या बाबत मात्र -

मौनच बाळगतात !

@ कवी- सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments