Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


देव सगळ्यात आहे -

देवाच्या दारी कशाला 

मनांतरी जरा स्मरा -

देव येई भेटायला !


पैसे फेकले म्हणजे -

देव भेटत नसतो !

देव भक्तीचा भुकेला -

भक्तांनाच तो भेटतो !


माणसात देव आहे -

माणसा कसा कळेना ?

माणसात देव शोधा -

देवच भेटे आपणा !


देव बाजूला सारून -

माणूसच देव झाला !

देवाच्या जागी बसून -

देवासम पुजू लागला !


देव देतोच म्हणजे -

जन्मच तेवढे देतो !

कर्म कसं करायचं -

आपल्यावर सोडतो !

@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं . 07620540722

Post a Comment

0 Comments