चारोळ्या
गेले ते गेले समजा -
आहे ते आपले म्हणा !
पळत्यापाठी धावणे -
धगधगीचेच म्हणा !
लोक तर सोन्यालाच -
घासून कां पाहतात ?
चंदन मात्र सगळे -
उगाळून लावतात
आयुष्यात नेहमीच -
ख-याचीच झीज होते !
खोट्याची मात्र सदैव -
उजागर होत जाते !
पैसे जसे येत जाते-
पैसे तसे जातेपण !
तरी पैशापेक्षा जगी -
विश्वासच खरे धन !
मी सत्य आहे म्हणून -
सत्य सांगत नसते !
खोटे मात्र आपलेच -
खरेच करू पाहते !
जगी आज प्रत्येकाचे -
व्यक्तित्व असते दोन !
एक जगा दाखवते -
दुसरे लपू पाहते !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments