Type Here to Get Search Results !

ज्ञानज्योत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्यतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न...



ज्ञानज्योत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्यतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुरस्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे वार रविवार दि.२२/१२/२०२४ रोजी अतिशय सुंदरतेने आणि नियोजनबद्ध आयोजन केले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवी , व्याख्याते नितिन चंदनशिवे दंगलकार यांनी भुषवले , तर उदघाटक म्हणून अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय घरडे , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . प्रिती मोरे , मा. मोहिनी कारंडे उपस्थित होत्या तर प्रमुख उपस्थिति हणमंत क्षिरसागर कथाकार, बाबासाहेब जाधव , दादासाहेब सोनवणे यांची होती.



भारताची श्रीमंती म्हणजे आपले संविधान होय . संविधान प्रास्ताविकेचे वाचन कुमारी ज्योत्स्ना काळे हिने केले . त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांनी आपल्या मधुर आवाजात स्वागतगीत सादर केले . त्यानंतर बुद्धवंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली . ज्ञानज्योत फाऊंडेशनच्या संस्थापक कार्याध्यक्षा कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन मून यांनी केले .उपस्थित अध्यक्ष, पाहुणे यांचे आदरातिथ्य संस्थेच्या वतीने करण्यात आले . पुढे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . 



सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सुभाताई लोढें यांनी आपले समृद्ध अनुभव विश्व लेखणीतून उलगडत त्यांनी सुमारे बावीस पुस्तकांचे लेखन केले आहे . विनम्र स्वभावाच्या असणाऱ्या सुभाताई यांचा शिक्षिका ते अधिकारी हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे . त्यांची जिगरबाज आणि दीपस्तंभ हि दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली . ज्ञानज्योत फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कविता काळे आमची संस्था पुरस्कार का देते आपले मत मांडून सर्व पुरस्कार्थी मान्यवरांची ओळख करून दिली .दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशक रणजित पवार यांनी पुस्तकावर आपले मत थोडक्यात व्यक्त केले.

साहित्यिक क्षेत्र ,सामाजिक , शैक्षणिक , पर्यावरण संवर्धन , सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्माननीय आयोजक ज्ञानज्योत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य ,मांजरी हडपसर पुणे आणि संत गाडगे महाराज विचार मंच, महाराष्ट्र राज्य ओतूर,पुणे यांच्या वतीने बुद्धवासी श्रीराम पुजांजी भरणे ( निवृत्त डी वाय एस पी राखीव पोलिस बल ) यांच्या स्मरणार्थ ज्ञानज्योत राज्यस्तरीय साहित्यसेवा पुरस्कार वर्ल्ड व्हिजन टाइम्सचे संपादक व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. नागेश हुलवळे यांना मा. अध्यक्ष नितीन चंदनशिवे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . अक्षय भोईटे यांना ज्ञानज्योत राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला . किशोर इंगोले , यवतमाळ यांना ज्ञानज्योत राज्यस्तरीय वृक्षमित्र व कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . त्यानंतर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने आयोजित काव्यस्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले . प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपाली आशिष राऊत बोईसर (पालघर) (रचना- धम्म सोहळा ) यांना देण्यात आले . द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सविता धामगये नागपूर ( रचना- तुझेच धम्मचक्र ) यांना देण्यात आले . तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रियंका बेंद्रे चंद्रपूर 

(रचना - माझा भिमा ) यांना देण्यात आले . उत्तेजनार्थ पारितोषिक मनोज रामचंद्र गायकवाड ( रचना- नमामी बोधी राजा ) यांना देण्यात आले . त्यानंतर बुद्धवासी कान्होजी चिंधूजी मून , अधिक्षक जिल्हा परिषद पंचायत समिती दारव्हा यांचे स्मरणार्थ मा. उमा लुकडे यांना ज्ञानज्योत राज्यस्तरीय साहित्यसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला . सुजाता व गोविंद बाबुराव नाणेकर , पुणे यांना ज्ञानज्योत राज्यस्तरीय वृक्षमित्र व पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला . नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली . त्यांना संत गाडगे महाराज काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला . प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कविता खैरनार बाविस्कर धुळे (रचना- भिडेवाडा सावित्रीबाई फुले ) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रुती दळवी डहाणू (रचना- विश्ववंदनीय जिजामाता ) तृतीय क्रमांकाचे पारितोषिक साधनाताई शेळके हडपसर पुणे (रचना - अनाथांची माय ) तर उत्तेजनार्थ पारितोषिक वत्सला बाई पवार पाटील परभणी ( रचना-तुज सम नसे दुजा ) यांना प्रदान करण्यात आला . सर्व मान्यवर पुरस्कारार्थीना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुष्प, सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,पाच पुस्तकं

आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले . मान्यवरांनी आपल्या मनोगतात सुंदर प्रबोधनात्मक विचार मांडले . उद्घाटक मा. संजय घरडे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास संशोधनाचा आढावा घेतला . मोहिनी कारंडे यांनी आपण स्वतः प्रयत्न करत राहून स्वतःचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन केले . डॉ . प्रिती मोरे यांनी शिक्षणाने माणूस घडतो . यासाठी आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे . असे मत व्यक्त केले .अध्यक्षीय भाषणात दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी इतिहासातील घटनांचा वेध घेत आपण उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे . इतिहासाच्या काळ्या कोळशांना उगाळत राहण्यापेक्षा वर्तमानातील सुवर्णमय क्षणांना सुंदर भविष्यासाठी उपयोगात आणले पाहिजे . त्यासोबत सदैव नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे . असे ते म्हणाले . आपल्या सुंदर निवेदनाने कवी आणि साहित्यिक संजय गवांदे यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. संत गाडगे महाराज विचार मंचच्या कार्यकारिणीचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीमध्ये बदल करत राजेश साबळे यांची सल्लागार, डॉ.खं. र.माळवे यांची अध्यक्ष, संजय गवांदे यांची उपाध्यक्ष, कविता काळे सचिव,कांचन मून सहसचिव, रेखा फाले संघटक, सौरभ नवले सहसंघटक ,नागेश हुलवळे यांची निवड करण्यात आली असून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संस्थापक रणजित पवार यांनी सर्वांना निवडपत्र प्रदान करण्यात आले.स्वागत प्रमुख ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर , मार्गदर्शक रघुनाथ कांबळे , संस्थेचे संस्थापक अध्यक्षा कविता काळे , संस्थापक कार्याध्यक्षा कांचन मून यांनी प्रास्ताविक , संत गाडगे महाराज विचार मंचचे संस्थापक कार्याध्यक्ष रणजित पवार , कवयित्री,रेखा फाले यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले . यासोबत पुण्यातील अनेक कवी,साहित्यिक उपस्थित होते.रणजित पवार यांनी आभार प्रदर्शन केले . गाडगे महाराजांचे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Post a Comment

0 Comments