पेसाच्या अंमलबजावणीच्या घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून माहिती पोहचवण्यात आली .....
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.श्री.भालेकर सर यांनी केले त्यामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी ग्रामसभांमध्ये कायद्या बाबत माहिती दिली गेली पाहिजे व लोक उपयोगी जास्तीत जास्त निर्णय घेतले पाहिजेत असे आव्हान कार्यक्रमावेळी केले......
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण सरपंच यांनी केले यावेळी त्यांनी पेसा कायद्याचा आधार घेऊन लोकांच्या बाबत लोक उपयोगी निर्णय पुढील काळात घेतले जातील असे सांगितले व पुढील काळामध्ये प्रत्येक निर्णय प्रक्रिय मध्ये लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असे आव्हान केले......
या वेळी ग्रामपंचायत सदस्य मा.राजेन्द्र शेळके यांनी पेसा कायद्या बद्दल माहिती दिली यामध्ये कायद्या निर्मिती व अंमलबजावणी साठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत याबाबत माहिती देण्यात आली.......
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.गणपत गवारी यांनी केले मा.श्री. भालेकर सर यांनी प्रास्ताविक केले आभार श्री.राहुल मते त्याच बरोबर या कार्यक्रमाला महिला,शालेय विद्यार्थी, ग्रामास्थ यांनी मानले मध्ये गावाच्या ग्रामस्थ यांची उपस्थिती होती
यावेळी उपस्थीत ग्रामपंचायत सदस्य मा.राजेंद्र शेळके, मा.सौ.बबाबाई सांगडे, लीलाबाई सांगडे, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मा.श्री. गणपत गवारी, राहुल मते,श्री. राजेंद्र वि.सांगडे उपस्थित होते

Post a Comment
0 Comments