चारोळ्या
कुणी आपलं नसून -
आपलं वाटू लागतं!
कुणी आपलं असून -
आपलं नाही वाटतं !
कुणाचं चुकलं तर -
तेंव्हा घेतो समजून !
आपण चुकलो तर -
कोण घ्यावे समजून ?
फुलांनी साथ सोडली -
पानांनी साथ सोडली !
मग खोड्यागत जीणं -
बहरून कशी आली ?
काही ऐकायचं नाही -
काही बोलायचं नाही !
सध्याच्या जगाचं तर-
काही पहायचं नाही !
देव कर्मच पाहतो -
पैसा पाहत नसतो !
आपण पैसा पाहतो -
कर्म पाहत नसतो !
मृत्यूच्याक्षणी माणूस -
खरं ते बोलू पाहतो !
जिवंतपणी मग तो -
खोटं कां बोलू पाहतो ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments