सा. उद्याचा शिलेदार शिरूर तालुका संपादक - सुरेश आप्पा गायकवाड
पुणे : काव्ययोग काव्यसंस्था, वसुधा इंटरनॅशनल व भारतीय विचारधारा पुणे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व कविसंमेलन २०२४ संपन्न झाले.
वसुधा इंटरनॅशनल भारतीय विचार धारा यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्या समाज कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमाचे आयोजक मा. वसुधा ताई नाईक ( महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा ) यांनी केले, वास्तविक दुःखाला सावरून पुढे जायचं असतं याचं उदाहरण या कार्यक्रमात दिसून आले, पूर्व नियोजित असा हा कार्यक्रम ठरला होता, मात्र काही दिवसांपूर्वी वसुधाताई यांचे जावयांचे दुःखद असे निधन झाले होते, परंतु सर्व दुःख बाजूला सारून वसुधाताई या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या, माऊली युवा क्रांतीची सर्व टिम आपल्या सोबत सदैव आहोत, असा आधार त्यांनी यावेळी दिला या कार्यक्रमप्रसंगी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments