Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



चारोळ्या 


जे काही चाललं आहे

चुकीचं चाललं आहे !

बरोबर असूनही -

चुकीचे कां म्हणती हे ?


सांगायचं खूप होतं -

पण सांगू न शकलो !

सांगितलं नाही हेच -

आज मी बरं म्हणालो !


रोज नवाच तमाशा -

रोज नवेच नाटक !

कधी येते सुख पाठी - 

कधी पाठोपाठ दुःख !


चोहोबाजूला माणसे -

आजूबाजूला माणसे !

माझ्या चौफेर माणसे -

कळेना कशी माणसे ?


माणसात वागूनही -

माणूस मज कळेना !

माणूस ओळखू कसं -

तेपण कुणी सांगेना !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .   07620540722

Post a Comment

0 Comments