चारोळ्या
आपण कसे आहोत -
जगाला काय माहीत ?
आपण कसे आहोत -
आपणालाच माहीत !
जगाला जग कळेना -
आपण कुठं लागावं ?
जगात काय चाललं -
जगाला कधी कळावं ?
आज पैसा झाला मोठा -
माणूस खूपच छोटा !
पैशापुढे माणसाला -
ठरविला जातो खोटा !
माणूस किती लहान -
याला नसते महत्व !
माणूस किती गुणाचा -
याला अधिक महत्व !
कालचा माणूस काल -
किती किमतीचा होता !
आजचा माणूस आज -
कवडीमोलाचा आत्ता !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments