Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 

लोकांचं ऐकून माझी -

जिंदगी बेहाल झाली !

माझं स्वतःचं ऐकता -

जगणे लायक झाली !


कसली रे ही जिंदगी -

कसलं म्हणू हे जग ?

जगायची इच्छा तरी -

जगू कां देईना जग ?


कोण घेशील काळजी -

कोण देईल काळीज ?

काळिज देता देताच -

काढून घेती काळीज !


लोकांनी सांगितलं की -

आपण सारं ऐकतो !

आपण सांगितलं की -

कुणीच कां न ऐकतो ?


गरीब जरूर आहे -

दरिद्री मुळीच नाही !

गरीब असूनपण -

जगतो थाटात शाही !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments