Type Here to Get Search Results !

शैक्षणिक बीट नारायणगांवच्या बीटस्तरीय स्पर्धा नगदवाडीत उत्साहात संपन्न.



 यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ अंतर्गत नारायणगांव बीटच्या बीटस्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा नगदवाडी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्ये धावणे,लांब उडी,उंच उडी,गोळा फेक,थाळी फेक,वक्तृत्व,बडबडगीते,कविता गायन,भजन,लोकनृत्य,मल्लखांब,लंगडी,बुद्धिबळ,कबड्डी,खो-खो,लेझीम,आट्यापाट्या अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.१० व ११ तारखेला दोन दिवस स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती जुन्नरच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,शाळा व्यवस्थापन समिती नगदवाडीचे अध्यक्ष दिनेश बढे व सर्व सदस्य, शाळा सल्लागार समिती नगदवाडीचे अध्यक्ष सुरेश बढे व सर्व सदस्य,केंद्रप्रमुख अशोक हांडे,दिनेश मेहेर,दत्तात्रेय साबळे, शिक्षक,ग्रामस्थ,पालक आदी मान्यवर उपस्थित होते.नगदवाडी,हिवरे तर्फे नारायणगांव व वारूळवाडी या केंद्रातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पडल्या.नगदवाडी शाळेने लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर हिवरे तर्फे नारायणगांव शाळेने कबड्डी व मल्लखांब मध्ये बाजी मारली. मांजरवाडी शाळेने लेझीम व खोखो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.आनंदवाडी व वळणवाडी शाळेने लंगडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर ठाकरवाडी,वारूळवाडी,खोडद, पाटेखैरे मळा,देवाची जाळी, वडगांव कांदळी तसेच नारायणगांव नं.१,२ व ३ या शाळांनी या विविध स्पर्धामध्ये यश मिळवले.नगदवाडी केंद्रातील सर्व शिक्षकांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग,कांदळी गावच्या सरपंच डॉ.पल्लवी भोर,ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी सर्वांचे आभार मानले.मंगेश मेहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments