Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


आपण काय करतो -

जगाला कसे ठाऊक ?

जगाचे काय चालले -

आपणा कसे ठाऊक ?


आपल्याला वाटते की - 

आपण  योग्य करतो !

इतरांना वाटते की - 

आपण चूक करतो !


कुणावाचून कुणाचे -

काही अडत नसते !

जे काही व्हायचे आहे -

ते तर होतच जाते !



कुणाला काय वाटते-

तसेच त्यांनी करावे !

आपणा काय वाटते -

आपण करीत जावे !


कळत नसेल तेंव्हा -

इतरांचे ऐकावेत !

कोण काय सांगतोय -

तेही ऐकून घ्यावेत ! 

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments