Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



  चारोळ्या 


सगळं जगच आज -

आपल्यापासून दूर !

आज आपल्यापासून -

आपणही स्वतः दूर !


कपडे चुरगळले -

आयुष्य चुरगळले !

परंतु मन अजुनी -

ताजेतवाने राहिले !


रात्रीतल्या अंधाराची -

आत्ता मुळीच ना भय !

आत्ता तर अंधाराची -

खूपच झाली सवय !


पूर्वीची ती हवा नाही -

पूर्वीचे वातावरण !

आजची हवा दुषित -

म्हणून हे प्रदूषण !


जगात इतकी गर्दी -

लोक एकटे पडले !

कोण कुणाच्या जवळ -

कुणा कळेचना झाले !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून ) 

मो .नं .07620540722

Post a Comment

0 Comments