शिरूर तालुका संपादक : सुरेश आप्पा गायकवाड
शिरूर : साप्ताहिक उद्याचा शिलेदार या नविन संपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा मौजे. मलठण ता. शिरूर जि. पुणे या ठिकाणी रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी प्रभाकर गावडे सी. ओ. मंत्रालय मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर गावडे हे होते. सप्ताहिक उद्याचा शिलेदार नविन संपर्क कार्यालय मलठण या ठिकाणी झाले म्हणून या भागातील सुदाम गायकवाड सर, अविनाश गुरुजी यांनी अतिशय छान अशा पद्धतीने मार्मिक शब्दात पत्रकारिता कशी असावी व काय केले पाहिजे व साप्ताहिक उद्याचा शिलेदारमधून नविन माहिती वाचायला मिळेल अशा शब्दात त्यांनी मनोगत मांडले, मंगलताई सासवडे सामाजिक कार्यकर्त्या यांनीदेखील अतिशय समर्पक भाषण करून न खचता न हरता साप्ताहिक उद्याचा शिलेदार महाराष्ट्राच्या पटलावर पोहोचेल अशा सदिच्छा व्यक्त केल्या, यावेळी गावातील ग्रामस्थांनी देखील साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा दिल्या. साप्ताहिकाचे संपादक प्रा. सतिश शिंदे यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारची निर्मिती व कालखंड सांगून अतिशय भारदस्त भाषण केले, पत्रकार बगाडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या. यानंतर अध्यक्ष मनोगतातून गावडे साहेब यांनी मौलिक शब्दात आपले विचार व्यक्त केले व साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाला शिरूर तालुका संपादक सुरेश आप्पा गायकवाड मलठण, सी ओ मंत्रालय प्रभाकर गावडे साहेब, प्रमुख पाहुणे चाकण येथील शालेय समिती सदस्य अंकुशराव आगरकर व मिनीनाथ मेमाने सामाजिक कार्यकर्ते, तसेच शिरूर तालुक्यातील सतीश वाखारे, नंदाताई कापरे, संदीप भाकरे, पत्रकार साहेबराव लोखंडे, मंगल सासवडे सामाजिक कार्यकर्त्या, पोलीस कॉ कुमारी तनुजा गोपाळघारे महाराष्ट्र पोलीस संभाजीनगर तसेच साखर कारखाना संचालक सुहास थोरात मा सरपंच प्रकाश गायकवाड तसेच मलठण मधील सर्व सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुदाम गायकवाड सर अविनाश गुरुजी व चंद्रकांत वावळ सर नवनाथ गायकवाड सर शरद कदम ह भ प नामदेव शिंदे शिरूर तालुका संपादक सुरेश आप्पा पुनमचंद गायकवाड यांनी केले होते. श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार बगाडे व काळोराम पवार संजय कुरुमकर उपस्थित होते तसेच गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते मा चेअरमन नानाभाऊ फुलसुंदर व सदस्य अरुणा ताई घोडे, विशाल पडवळ, विलास गोसावी, विलास रोहिले पत्रकार कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड सर यांनी केले तर आभार सुरेश आप्पा गायकवाड व सुहास थोरात यांनी मानले.


Post a Comment
0 Comments