Type Here to Get Search Results !

स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन कडून २०० दिव्यांग लोकांना आवश्यक साधने साहित्य मोफत वाटप



शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन ग्रूप च्या वतीने पुर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग लोकांना तपासणी करून आवश्यक साधने साहित्य मोफत वाटप खेड (राजगुरूनगर )येथे सुरू करण्यात आले आहे जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक चव्हाण श्री अरूण शेरकर अध्यक्ष श्री व डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ बिडवई व श्री संभाजी भांगरे दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका याच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना खेड राजगुरूनगर येथे नेण्यात आले तेथे एकूण १९० लोकांना साहित्य वाटप करण्यात आले दिनांक २० डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे असे स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन ग्रूप चे प्रमुख श्री प्रविण कर्ण सर सी एस आर यांनी माहिती दिली असून दिव्यांग लोकांना तपासणी करून आवश्यक साधने साहित्य मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे साहित्यामध्ये व्हीलचेअर ,वाॅकर ,कॅलिपर बुट , काठी , एलबो स्टीक ,कृत्रिम पाय ,हात ,कानाची मशीन चे वाटप करण्यात येत असून स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन ग्रूप कडून २५ डिसेंबर पर्यंत कॅम्प चे आयोजन खेड राजगुरूनगर येथे करण्यात आले असून सर्व दिव्यांग लोकांना आवहान करण्यात येत आहे की आपण आपल्या भागातील गरजू दिव्यांग लोकांपर्यंत माहिती देवून मोफत साहित्य वाटप चा लाभ घ्यावा  

तसेच जुन्नर तालुक्यातील काही दिव्यांग लोक वंचित राहिले आहेत अश्या दिव्यांग लोकांनी आपले नाव श्री राधेश्याम दिव्यांग संस्थेच्या कार्यालयात करून घ्यावी या लोकांना दिनांक २३ डिसेंबर रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहे येण्याजाण्यासाठी मोफत गाडी ची व्यवस्था करण्यात आली आहे असे संस्थेचे अध्यक्ष अरूण शेरकर यांनी केले आहे या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन के टी एम चे डायरेक्टर श्री ओमेशजी पंडीता श्री विनीत कुमार रतनपुरा क्यु हेड बजाज अॅटो लि. श्री प्रोतय बाॅस ए व्ही चेतक पी पी ऑफीसर बजाज अॅटो लि. स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन ग्रूप हेड श्री प्रविणजी कर्ण डाॅ श्री सुमेध लव्हाळे डाॅ निलेश पवळे दिपक पुजारी सर डाॅ कोमल श्रीवास्तव डाॅ किर्ती दौडकर व स्पार्क मिंन्डा फाऊंडेशन ग्रूप डिसेंट फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष 

जितेंद्र भाऊ बिडवई श्री शिरीष डुंबरे, श्री दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्याम संस्था अरूण शेरकर अध्यक्ष राहुल मुसळे उपाध्यक्ष सुनिल जंगम नरसिंग कलोसिया श्री हरी नायकोडी केरभाऊ नायकोडी हनुमंत थोरवे सचिन वाव्हळ  

सौरभ मातेले अमोल तळपे सुरेखा नवले अनंथा मुंडे गोविंद ढमाले याकुब शेख बाळु कोकाटे शाहिद पटेल राहुल तिवाटणे विजय शेळके मीर फरहान अली गोरक्ष नरविर भरत कोंडे रूपेश शेटे कोमल शेटे व सुर्यवंशी शशिकांत डोके संचित घोगरे माऊली गवारी उपसरपंच चावंड जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी दिव्यांग लोकांना साहित्य मिळाल्याचा आनंद दिव्यांग लोकांच्या आनंद चेहर्यावर दिसत होता

Post a Comment

0 Comments